Devoleena Bhattacharjee: देवोलीना भट्टाचार्जीला मुलाच्या रंगावरून ट्रोलिंग; ट्रोलर्सना उत्तर देत म्हणाली...'तुला रंग काय...'
social media: देवोलीना भट्टाचार्जीने आपल्या सात महिन्यांच्या मुलाचे फोटो शेअर करत वाढदिवस साजरा केला. मात्र, त्याच्या त्वचेच्या रंगावरून काही ट्रोलर्सनी आक्षेपार्ह टीका केली, त्याला तिने रोखठोक उत्तर दिलं.
‘साथ निभाना साथिया’ आणि ‘बिग बॉस १३’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे; पण यावेळी अभिनयामुळे नाही, तर आपल्या मुलाच्या रंगावर झालेल्या सोशल मीडियावरील टीकेमुळे.