Dharmaveer 2 : "ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!" ; 'धर्मवीर २' चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dharmaveer 2 Teaser : आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या धर्मवीर २ सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.
Dharmaveer  2 Teaser
Dharmaveer 2 Teaser Esakal

Dharmaveer 2 Movie : धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमाच्या सिक्वेलचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. सोशल मीडियावर सिनेमाचा टीझर गाजतोय.

सिनेमाचा धमाकेदार टीझर

अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारतोय. अत्यंत चर्चेत राहिलेल्या या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिनेमाच्या टीझरमध्ये पाहायला मिळालं कि,एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात... त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!' अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या माणुसकीची, त्यांच्या दराऱ्याची आणि हिंदुत्वाची एक झलक पाहायला मिळते.

"धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.

प्रसाद ओक यांच्याबरोबर अभिनेता क्षितिश दाते एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार आहे. यावेळी सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या व्यतिरिक्त स्नेहल तरडेही या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Dharmaveer  2 Teaser
Dharmaveer 2: 'धर्मवीर 2' मध्ये एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने शेअर केली शूटींगची झलक

हा बहुप्रतीक्षित सिनेमा ९ ऑगस्ट २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख सतत या सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान करण्यात येतोय. त्यामुळे कथानकाविषयी, सिनेमात कोण कलाकार असणार या विषयी सगळेचजण उत्सुक आहेत. हा सिनेमा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा रिलीज होत असल्याने राजकीय वर्तुळात देखील या सिनेमाची चर्चा आहे.

Dharmaveer  2 Teaser
Dharmaveer 2 : "मी आधी धर्मवीरचा पहिला भाग बघणार..." ; धर्मवीर २ चं पोस्टर अनावरण करताना बॉबी देओलने केलं टीमचं कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com