

dharmendra image as he-man
esakal
धर्मेंद्र म्हटल्यावर डोळ्यांसमोर काय येते... तर ‘कुत्ते...कमिने...’ असे चित्कारत खलनायकासह एकाच वेळेस अनेकांना बेदम चोप देणारा नायक. मात्र, अभिनेता म्हणून अशा भूमिकांसह अतिशय आदर्शवादी, संवेदनशील नायकही धर्मेंद्र यांनी रंगवला. आपल्या मेहनतीने, धडपडीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार वाटचाल केली.