

dharmendra death last video
esakal
बॉलिवूड प्रेक्षकांसाठी आजचा दिवस हा अतिशय वाईट होता. आज २४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांचे लाडके धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडचे ही-मॅन म्हणवले जाणारे धर्मेंद्र प्रेक्षकांचे अत्यंत लाडके होते. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. कित्येक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. गेले कित्येक दिवस त्यांची प्रकृती ढासळलेली होती. त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. अखेर त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. दुपारी जरी ही बातमी समोर आली असली तरी त्यांचं निधन हे सकाळीच झालं होतं. त्यांचा ऍम्ब्युलन्समधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.