

dharmendra property
esakal
बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंजाबच्या एका लहानशा गावात जन्मलेला हा मुलगा इतका मोठा अभिनेता होईल याची कुणीही कल्पना केली नव्हती. एकेकाळी जेवणासाठी पैसे नसलेले धर्मेंद्र आज कोट्यवधींचे मालक आहेत. संघर्ष करत, प्रत्येक परिस्थितीशी लढत ते आज इथवर पोहोचलेत. त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे याबद्दल जाणून घेऊया.