

DHARMENDRA
ESAKAL
बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं. मात्र धर्मेंद्र हे नेहमीच 'रिअल फॅमिली मॅन' म्हणून ओळखले जातात. सिनेविश्वाच्या झगमगाटातही ते कधीही आपल्या माणसांना विसरले नाहीत. त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि काळजी घेतली नाही, तर गावातील चुलत भावांना देखील भरभरून प्रेम दिलं. धर्मेंद्र यांचा हा किस्सा त्यांच्या वडिलोपार्जित डांगो गावातील आहे, जिथे त्यांनी आपली बरीचशी जमीन चुलत भावांना दिली. यातून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा दिसला होता .