

dharmendra last wish
esakal
बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांनी आज २४ नोव्हेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आलेलं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांनी जुहूच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना आणि बॉलीवूडला मोठा धक्का बसलाय. ते ८९ वर्षांचे होते. या वयातही ते बॉलिवूडमध्ये सक्रीय होते.मात्र त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.