

DHINCHYAK POOJA WEDDING
ESAKAL
काही वर्षांपूर्वी 'सेल्फी मैंने ले ली आज', 'दिलो का शुटर हैं मेरा स्कुटर' ही गाणी चांगलीच व्हायरल झाली होती. या गाण्यांमुळे घराघरात पोहोचली ती सोशल मीडिया स्टार म्हणजे ढिंच्याक पूजा. आता ढिंच्याक पूजाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तिने इंस्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. मात्र पूजाने अचानक लग्न केल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. पूजा सध्या ३३ वर्षाची असून तिने कुणासोबत लग्न केलंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.