
Marathi Entertainment News : 'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं “आवशीचो घो” यांनी आधीच रसिकांच्या मनात तुफान उत्सुकता निर्माण केलीय. प्रेक्षकांची ही उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच ‘दशावतार’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर एका शानदार समारंभात नुकताच प्रदर्शित करण्यात आला. झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला ‘दशावतार’ चित्रपट मराठी चित्रसृष्टीत एक नवी झळाळी घेऊन अवतरत आहे.