

Entertainment News : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याच्या 'दिल-ल्युमिनाटी टूर 2024' मुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा पुण्यातील कोथरूडमध्ये कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टमध्ये अनेक व्हिडीओ चर्चेत असले तरीही एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पुण्यातील चाहत्यांशी मराठीत संवाद साधत त्याने पुणेकरांची मनं जिंकली. त्याची ही कृती अनेकांना आवडली.