Diljit Dosanjh: रॅपर नसीबनं केलं ट्रोल, दिलजीत दोसांझनं मोजक्या शब्दात उत्तर देऊन केली बोलती बंद, नेमकं प्रकरण काय?

Diljit Dosanjh: नसीबनं दिलजीतला त्याच्या केसांवरुन आणि पगडीवरुन ट्रोल केलं आहं. आता दिलजीतनं नसीबच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Diljit Dosanjh
Diljit Dosanjhesakal

Diljit Dosanjh: प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझनं (Diljit Dosanjh) फक्त देशातच नाही तर परदेशात देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. दिलजीतचा 'चमकिला'हा चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील दिलजीतच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता 'दिल-लुमिनाटी' या म्युझिक टूरमधून दिलजीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या म्युझिक टूरच्या कॉन्सर्टला लोक गर्दी करत आहे. पण दिलीजीतला अनेक जण ट्रोल देखील करत असतात. सध्या रॅपर नसीब आणि दिलजीत यांच्यामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. नसीबनं दिलजीतला त्याच्या केसांवरुन आणि पगडीवरुन ट्रोल केलं आहं. आता दिलजीतनं नसीबच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे.

नसीबनं शेअर केली पोस्ट

नसीबनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दिलजीतच्या डोक्यावर पगडी दिसत नाही, तसेच त्याचे केस बारीक दिसत आहेत. "तू पंजाबी म्हणवण्याच्या लायकीचा नाहीयेस", "आधी पगडी बांधायला शिक", असं म्हणत नसीबनं दिलजीतला ट्रोल केलं. आता नसीबला दिलजीतनं मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.

दिलजीतनं दिलं उत्तर

"भावा, तुला खूप प्रेम., तुला तुझ्या कामात यश मिळेल, अशी मी आशा करतो. तू स्वत: बोलत आहेस आणि तुच त्या गोष्टींची उत्तरं देत आहे. तुला भरभरुन प्रेम", अशी पोस्ट करुन दिलजीतनं नसीबच्या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.

दिलजीतच्या एका पोस्टवर नसीबनं कमेंट केली,'आत्मा कितीला विकला?', यावर दिलजीतने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Diljit Dosanjh
Diljit Dosanjh: "त्या घटनेमुळे आई-वडिलांपासून कायमचा दुरावलो", दिलजितने केला धक्कादायक खुलासा

कोण आहे नसीब?

रॅपर नसीबचे खरे नाव बिक्रमदीप सिंग धालीवाल असं आहे. तो लुधियानाचा असून त्याची ओल्ड स्कूल, परांदा आणि मिडनाइट MOB ही गाणी लोकप्रिय ठरली.

Diljit Dosanjh
Amar Singh Chamkila: अख्ख्या पंजाबला तालावर नाचवलं, अश्लील गाण्यांचा आरोप अन् हत्या; विचार करायला लावणारा 'अमर सिंह चमकीला'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com