Diljit Dosanjh: "त्या घटनेमुळे आई-वडिलांपासून कायमचा दुरावलो", दिलजितने केला धक्कादायक खुलासा

Diljit Dosanjh: नुकतंच रणवीर अलाहबादीयाच्या युट्युब चॅनेलला दिलेलय मुलाखतीत दिलजीत दोसांझने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
 दिलजितने केला धक्कादायक खुलासा
Diljit Dosanjhesakal

Diljit Dosanjh: पंजाबी सुपरस्टार आणि आता बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख बनवणारा कलाकार दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) स्वतःचा एक चाहतावर्ग निर्माण केलाय. गायक, गीतकार, अभिनेता असलेला दिलजीतने सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला. नुकतंच रणवीर अलाहबादीयाच्या युट्युब चॅनेलला दिलेलय मुलाखतीत त्याने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

अकरा वर्षांचा असतानाच दिलजीतचे त्याच्या आई-वडिलांशी असलेले घट्ट संबंध तुटले अस त्याने यावेळी सांगितलं. याविषयी आणखी सांगताना तो म्हणाला,"मी अकरा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मामांनी माझ्या आई-वडिलांना मी दिलजीतला शिक्षणासाठी माझ्यासोबत शहरात घेऊन जातो असं सांगितलं. माझे आई-बाबा लगेच तयार झाले. माझ्या मामांनी त्यांना मला विचारायला सांगितलं पण ते म्हणाले त्याची काही गरज नाही. पण मला वाईट वाटलं होतं कि मला कुणी मला जायचं आहे कि नाही विचारलंच नाही. मी शहरात राहायला गेलो आणि तेव्हापासुन माझे माझ्या आई-वडिलांशी संबंध दुरावले. "

दिलजीत म्हणाला, "अकराव्या वर्षी मी सगळ्यांपासून दुरावलो"

यावर अधिक बोलताना तो म्हणाला,"त्यानंतर मी अजून दूर राहू लागलो. मला गावात साजरी होणारी दिवाळी, होळी खूप आवडायची अजूनही आवडते. माझ्या पालकांनी अर्थातच माझ्याविषयी चांगला विचार केला होता. मी शहरात जाऊन काहीतरी शिकेन, प्रगती करेन म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. मी आई-वडिलांवर रागावलेलो असल्याने मी फार फोन करायचो नाही फक्त हेच कारण नव्हतं पण त्यावेळी पैसेही माझ्याजवळ कमी होते. त्यामुळे असं झालं कि आमचं नातं तितकं घट्ट नाही झालं. मी माझ्या आई-वडिलांचा खूप आदर करतो. माझी आई आमच्या कुटूंबाचा आधारस्तंभ आहे तर माझे वडील खूप साधे आहेत. त्यांनी मला इतकंच सांगितलं तुला या घरात राहायला मिळेल, जेवायला मिळेल बाकी त्यांनी मला माझ्या शिक्षणाबद्दल, मी काय करतोय त्याबद्दल मला कधीच काही विचारलं नाहीये. पण अकराव्या वर्षी मी सगळ्यांपासून दुरावलो. माझं कोणासोबतही नातं घट्ट झालं नाही. "

दरम्यान दिलजीतचा लवकरच 'अमर सिंग चमकीला' हा सिनेमा 12 एप्रिल 2024 ला रिलीज होतोय. त्याच्या या नवीन सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com