Dipika Kakar Gets Emotional While Talking About Liver Cancer
esakal
दीपिका कक्कड सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसापासून तिची लिवर कॅन्सरवर ट्रिटमेंट सुरु आहे. यामुळे तिला अनेक साइड इफेक्ट्स आणि त्रासाला सामोरं जावं लागतय. अशातच दीपिका काही दिवसापूर्वी ऑन्कोलॉजिस्टला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. दीपिकाने तिच्या इमोशनल मोमेंटबद्दल तिच्या व्लॉगमध्ये चाहत्यांना सांगितलं आहे. दीपिका म्हणाली की, जेव्हा ती तिच्या डॉक्टरांना भेटायला गेली, तेव्हा ती स्वत:ला सांभाळू शकली नाही. त्यामुळे तिला रडू कोसळलं. तेव्हा तिचा पती शोएबने तिला सांभाळून घेतलं.