

deepti lele
esakal
दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. काम, डेडलाइन, घरची कामं यासगळ्यात अनेक स्त्रिया स्वतःच्या आहाराची, शरीराची काळजी घेत नाहीत. मात्र याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर दिसतो. आपलं आरोग्य जपण्यासाठी आपल्या त्वचेची आणि जोडीने केसांची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. सोशल मीडियावर याबद्दल अनेक इन्फ्लुएन्सर्स वेगवेगळ्या क्लुप्त्या सांगताना दिसतात. कलाकारांना तर या गोष्टीची जास्त काळजी घ्यावी लागते. अशातच आता अभिनेत्री दीप्ती लेले हिने तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य सांगितलंय.