
पुन्हा शिवाजी राजे भोसले या चित्रपटातील पहिलं गीत प्रदर्शित झालं असून भक्तीभावाने भारावलेलं वातावरण तयार करतंय.
या गाण्याद्वारे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी प्रथमच संगीतकार म्हणून पाऊल ठेवले आहे.
शंकर महादेवन यांच्या दैवी आवाजासोबत गौरव चाटीचं दमदार गायकत्त्व, ढोल-ताशांचा दणदणाट आणि आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गाण्याला भव्यता मिळाली आहे.