

Marathi Entertainment News : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला सन्मान देणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अशाच परंपरेचा गाभा उलगडणारा बहुचर्चित 'गोंधळ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पसरली आहे. आता या उत्सुकतेत भर घालत दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक अनोखे आवाहन केले आहे. ज्यामुळे सगळेजण चक्रावले आहेत.