

DHARMENDRA BROTHER DEATH
ESAKAL
बॉलिवूडचे ही- मॅन धर्मेंद्र यांचं काल २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. ३०० हुन अधिक चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्याने वयाच्या ८९ व्या वर्षी चाहत्यांचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मात्र देओल कुटुंबीयांनी असाही एक दिवस पाहिलाय जेव्हा हे संपूर्ण कुटुंब हादरलं होतं. धर्मेंद्र यांच्या भावाची सेटवर गोळ्या घालून खुलेआम हत्या करण्यात आली होती.