
Marathi Entertainment News : कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर नुकतीच संगीतकार कुणाल भगत बरोबर लग्नबंधनात अडकली. कोकणातील वालावल गावात तिचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी तिच्या आई-वडिलांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अंकिताविषयीचा भावूक किस्सा शेअर केला.