DORAEMON FIRST THEATRICAL RELEASE IN INDIA
esakal
DORAEMON NEW NOBITA UNDERSEA ADVENTURE MOVIE: टेलिव्हिजनवरून अनेक वर्षे मुलांच्या मनावर छाप उमटवणारा डोरेमॉन आता पहिल्यांदाच भारतीय चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'डोरेमॉन द मुव्ही: न्यू नोबिता अँड द कॅसेल ऑफ द अंडरसी डेव्हिल' हा चित्रपट २ ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सकडून वितरित होणारा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहता येणार असून, निवडक ठिकाणी ४DX मध्येही प्रदर्शन होणार आहे.