DRISHYAM 3
esakal
भारतीय सिनेसृष्टीत चर्चेत असलेला सिनेमा दृश्यम आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. विजय साळगावकर, त्याचे सिनेमे आणि २ ऑक्टोबर याची चर्चा अनेक वेळा होताना पहायला मिळतेय. ३१ जुलै २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यमला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भागही तितकाच गाजला. दरम्यान आता दृश्यमचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.