
Bollywood News : उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझमधील घरावर आज 29 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता धाड टाकली. पॉर्नोग्राफी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. फक्त राज कुंद्राच नाही तर या प्रकरणाशी संबंधित सगळ्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे. 2021 मध्ये राज कुंद्राला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.