
मराठी चित्रपटसृष्टीत आता बॉलीवूड तारकांचा ओढा दिसू लागला आहे. अभिनेत्री निकिता दत्ताने घरत गणपती या मराठी चित्रपटात काम केले होते. आता अभिनेत्री एल्ली अवराम आता मराठी सिनेविश्वात पदार्पण करत आहे. ‘इलू इलु' या आगामी चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. फाळके फिल्म्स एंटरटेनमेंट निर्मित आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित हा सिनेमा ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.