बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी हा सलमानच्या टायगर 3मध्ये व्हिलनच्या भूमिकेत होता. त्याने नकारात्मक भूमिकेतील आपल्या अभिनयातून चाहत्यांना चकित केलं होतं. अनेक दिवसापासून इमरान हाशमी त्याच्या ग्राऊंड झिरो चित्रपटावरून चर्चेत आहे. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून टीझरमध्ये इमरान जवानाच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे.