EMRAAN HASHMI KISSING SCENES
esakal
EMRAAN HASHMI REVEALS WIFE PARVEEN SHAHANI GIFT DEAL: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्याचा मर्डर, जहर या सिनेमांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. आपल्या चित्रपटांमधील बोल्ड आणि किसिंग सीन्ससाठीही ओळखला जातो. मात्र, त्याच्या अशा सीन्सवर पत्नी परवीन शाहानीची प्रतिक्रिया कशी असते, याचा खुलासा खुद्द इमरानने केला आहे. दरम्यान इमरान हाश्मीची पत्नी परवीन शाहानी ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणं पसंत करते. इमरान आणि परवीन हे शाळेपासूनचे मित्र आहे. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. परंतु अनेक वेळा इमरानला एक प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे, 'प्रत्येक बोल्ड किंवा किसिंग सीननंतर पत्नीची काय प्रतिक्रिया असते?'