
Navjyot Singh Siddhu Exclusive Interview
Entertainment News : भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हा उत्तम समालोचक आहेच शिवाय छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन त्याने आपण चांगले परीक्षक असल्याचे सिद्ध केले आहे. आतापर्यंत तो विविध रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाला आहे आणि त्याने आपल्या उत्तम गुणांच्या जोरावर तसेच शायरीतून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. आता तो सोनी टीव्हीवरील इंडियाज गाॅट टॅलंट या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाला आहे. हा शो सोनी टीव्हीवर दाखल झाला असून त्याची थीम आहे, “जो अजब है, वो गजब है”. सिद्धू यांच्यासोबत मलायका अरोरा आणि शान हेदेखील परीक्षक म्हणून दिसत आहेत. त्याबाबत सिद्धू बरोबर साधलेला संवाद...