
मनोरंजन जगतातून एक अतिशय दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध इंफ्लुएंसर मीशा अग्रवालचा मृत्यू झाला आहे. मीशा तिच्या मजेदार रील आणि विनोदी कंटेंटसाठी ओळखली जात होती. मीशाच्या मृत्यूची बातमी येताच सोशल मीडियावरील सर्वांना धक्का बसला. वयाच्या २४ व्या वर्षी मीशाने या जगाचा निरोप घेतला आहे. मीशाच्या मृत्यूची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना देण्यात आली आहे.