
Bollywood News : सन २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट छोट्या शहरातील प्रेमकथा आणि नात्यांमधील गुंतागुंत यामुळे प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात राजकुमार राव आणि कृती खरबंदा यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. पण आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो आहे.