
Mystery Around Zubeen Garg’s Death Deepens Investigation On
Esakal
प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचं सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना निधन झालं. त्यांचं पार्थिव सिंगापूरहून गुवाहाटीला आणण्यात आलं. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. घरापासून एअरपोर्टपर्यंत लोकांनी गर्दी केली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा स्वत: जुबीन गर्ग यांचे पार्थिव आणण्यासाठी दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्री सरमा यांनी जुबीन यांच्या मृत्यूची चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलंय.