

"Living without fear is the greatest privilege; Discussion on women safety."
Sakal
रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास शहरात एकट्याने प्रवास करताना कोणत्याही महिलेच्या मनात सुरक्षिततेची एक अनामिक भीती आणि सततची धाकधूक असते. सारखा गुगल मॅप तपासणे, कॅब ड्रायव्हरवर संशय आल्यास घरच्यांना लोकेशन शेअर करणे किंवा आपल्यावर कोणाचे तरी लक्ष आहे हे दाखवण्यासाठी फोनवर बोलण्याचे नाटक करणे... हा अनुभव जवळपास प्रत्येक तरुणीने कधी ना कधी घेतलाच असतो.