

Aishwarya Rane
ESakal
मुंबई : चंदेरी दुनियेचे झगमगते आयुष्य, मागे-पुढे करणारे शेकडो चाहते, प्रतिष्ठेचा 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळवलेला आणि 'धूमधडाका'सारख्या सुपरहिट चित्रपटातील मुख्य नायिका ऐश्वर्या राणे कधीकाळी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आज त्या जगण्यासाठी क्रूर संघर्षाचा सामना करीत आहेत. वयाच्या ७२व्या वर्षी डोक्यावर हक्काचे छप्पर आणि उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने एका स्टॉलसाठी मुंबई महापालिकेचे उंबरठे झिजवण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.