SHASHANK KETKAR’S BIRTHDAY WISH FOR MANDAR DEVASTHALI
esakal
Shashank Ketkar Wishes director Mandar Devasthali: अभिनेता शंशाक केतकर यांच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. तसंच शंशाक केतकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. समाजात घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर तो परखडपणे त्याचे मत सुद्धा मांडतो. अनेक व्हिडिओ शेअर करत तो सत्य परिस्थिती सुद्धा जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो.