
Entertainment News : नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपला यांच्या लग्नाविषयी सगळेचजण उत्सुक आहेत. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. पण मोठ्या सुनेचं घरात आगमन होण्यापूर्वी नागार्जुन यांनी धाकट्या सुनेचंही थाटात स्वागत केलं आहे. नागार्जुन यांचा धाकटा मुलगा आणि नागा चैतन्य याचा धाकटा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनीचा साखरपुडा नुकताच पार पडला. त्याची गर्लफ्रेंड झैनाब रावदजीशी त्याने साखरपुडा केला. अखिलची आई अमलाने तिच्या सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो शेअर करत या बातमीला पुष्टी दिली.