Gadhvach Lagna: 'गाढवाचं लग्न' या लोकनाट्यातील गंगी काळाच्या पडद्याआड ; प्रभा शिवणेकर यांनी घेतला अखेरचा श्वास

लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचं निधन झालं. 1974 साली त्यांना भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
Prabha Shivnekar
Prabha ShivnekarEsakal

लोककलावंत आणि 'गाढवाचं लग्न' या लोकनाट्यातील गंगी या पात्रामुळे घराघरात पोहोचलेल्या प्रभा शिवणेकर यांचं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुळशी तालुक्यातील जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'गाढवाचं लग्न' या वगनाट्याने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या या गाजलेल्या या नाटकावर काही काळाने सिनेमाही आला.  भारत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीनं 1974 साली त्यांना तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे राज्य शासनानं त्यांचा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार देऊन गौरव केला होता.

प्रभा यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची बहीण बूबाई कदम आणि भाऊ सचिन कदम असा परिवार आहे. प्रभा या अविवाहित होत्या. त्यांच्या भाऊ आणि बहिणीनं प्रभा शिवणेकर यांच्या शेवट पर्यंत सांभाळ केला आणि त्यांची सेवा केली.

Prabha Shivnekar
Gadhvach Lagna: 'गाढवाचं लग्न' या लोकनाट्यातील गंगी काळाच्या पडद्याआड ; प्रभा शिवणेकर यांनी घेतला अखेरचा श्वास

गाढवाचं नाटक गाजलं

गाढवाचं लग्न हे वगनाट्य खूप गाजलं. शंकरराव शिवणेकर, वसंत अवसरीकर, प्रभाताई शिवणेकर, दादू इंदुरीकर या कलाकारांनी या वगनाट्यात काम केलं होतं. या नंतर मोहन जोशी आणि सविता मालपेकर यांनी हे वगनाट्य व्यावसायिक रंगभूमीवर सादर केलं. त्यांचं सादरीकरणही खूप गाजलं.

त्यानंतर या नाटकाचं सिनेमातही रूपांतर झालं. मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, संजय खापरे यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. तर सोनाली कुलकर्णीने रंभा ही अप्सरेची भूमिका साकारली होती. हा सिनेमा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. राजू फुलकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

Prabha Shivnekar
Makarand Anaspure : मकरंद अनासपूरे 'एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर'

गाढवाचं लग्न नाटकाचं कथानक

सावळ्या नावाचा कुंभार स्वर्गात जातो आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याकडे नवीन गाढव येत आणि हे गाढव त्याला राजाने त्याच्या मुलींसाठी लावलेला 'पणा'चा विडा उचलायला सांगतो. त्यानंतर ते गाढव तो पण पूर्ण करतो आणि जेव्हा त्या राजकुमारीच गाढवाशी लग्न होतं तेव्हा तो शापित गंधर्व असल्याचं समजत असं या वगनाट्याचं कथानक होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com