GAUTAMI PATIL AGA AI GA SONG VRIAL
Esakal
GAUTAMI PATIL NEW DANCE SONG AGA AI GA RELEASE: महाराष्ट्राच्या लोकमनावर आपल्या नृत्याची छाप पाडणारी गौतमी पाटील आता 'देवघर ऑन रेंट' या आगामी मराठी चित्रपटातील 'अगं आई गं...' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अस्सल मराठमोळा ठेका, आधुनिक संगीत आणि गौतमीच्या दिलखेचक नृत्याची जोड असलेले हे गाणे प्रदर्शित झाले असून, तिच्या नृत्याविष्कारामुळे गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.