

madhuri dixit on gautami patil
esakal
सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय. या मंचावर अनेक कलाकारांनी हजेरी लावलीये. हास्यजत्रेच्या टीमसोबत इतर कलाकारही या मंचावर येऊन गेलेत. आता मराठमोळी नृत्यांगना गौतमी पाटील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. या निमित्ताने गौतमी माधुरीसोबत गप्पा मारताना दिसणार आहे. या गप्पांच्या ओघात गौतमी माधुरीसमोर तिच्या व्हायरल व्हिडिओचा आणि त्यानंतर झालेल्या टीकेचा उल्लेख करते. शिवाय आता तिने स्वतःमध्ये केलेले बदलदेखील गौतमीने माधुरीला सांगितले आहेत.