

GAUTAMI PATIL ON RADHA PATIL
ESAKAL
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आलेल्या १७ सदस्यांमध्ये एक सदस्य होती राधा मुंबईकर म्हणजेच राधा पाटील. 'बिग बॉस मराठी ६' च्या प्रीमिअर सोहळ्यात मंचावर येताच राधाने प्रचंड आत्मविश्वास दाखवत आपण ट्रॉफी जिंकणार असं सांगितलं होतं. या बोलण्यात तिने मुद्दाम गौतमी पाटीलचं नाव घेत तिला डिवचलं होतं. गौतमी आणि राधा या एकाच प्रोफेशनमध्ये असल्याने त्यांच्यामध्ये वैर आहे. त्यामुळेच मंचावर राधाने, मी खूप लोकांना पळवून लावलंय. जे काय महाराष्ट्रामध्ये एखादं नाव इकडे तिकडे गाजतंय त्यांना तर मी खूप आधीच पळवून लावलंय. आणि मी माझ्या टॅलेंटनुसार कोणाला घाबरत नाही. मग ती गौतमी पाटील असो की कोणीही असो मी नाय घाबरत, असं विधान केलं होतं. आता राधाच्या या वक्तव्यावर गौतमीने जशास तसं उत्तर दिलंय.