नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान गौतमीचं एक 'कृष्ण मुरारी' गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमीनं गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर गाण्याचं पोस्टर शेअर केलं होतं. आता या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.