'झी मराठी' वाहिनीवर सध्या चर्चेत असलेली मालिका 'देवमाणूस - मधला अध्याय' ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत असून अनेक मोठे सेलिब्रिटींची पाहुणे कलाकार म्हणून एन्ट्री पहायला मिळते. अशातच काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकर, अलका कुबल आणि आता गौतमी पाटीलने मालिकेत एन्ट्री घेतल्याचं मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे मालिकेत गौतमीचा हटके अंदाज पहायला मिळणार आहे. हे असलं तरी गौतमीचं सेटवर नरु आजीसोबत बॉण्डिंग फार खास झालंय. देवमाणूस मालिकेत किरण गायकवाडसोबतच नरु आजीचा हटके अंदाज सुद्धा तितकाच चर्चेत आला होता. त्यात आता गौतमी आणि नरु आजीचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतमी आणि आजीने भन्नाट डान्स केलेला आहे.