

gayatri datar
ESAKAL
लेकीचं लग्न हे प्रत्येक आईवडिलांसाठी खूप हळवा क्षण असतो. आपली तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी दुसऱ्याला देताना त्यांच्या मनात प्रचंड घालमेल सुरू असते. हीच घालमेल अभिनेत्री गायत्री दातारच्या लग्नात तिच्या आईने बोलून दाखवली. 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिने २८ एप्रिल रोजी श्रीकांत चावरेसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. गायत्रीचा आणि तिच्या आईचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात गायत्रीची आई जे बोलते ते ऐकून तिच्या नवऱ्यालाही रडू कोसळतं.