GENELIA DESHMUKH
esakal
RITESH DESHMUKH'S WIFE GENELIA TALKS ABOUT HER MARATHI SKILLS: प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिचा मोठा चाहतावर्ग आहे.तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलीयाची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघं एकमेकांची घेत असलेली काळजी, प्रेम सगळं चाहत्यांना आवडतं. रितेश जेनिलिया यांचं रिलेशन १० वर्षांचं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर जिनिलीयानं लातूरची सून झाल्यानंतर सगळ्या मराठी परंपरा जोपासल्या. मोठ्या आपुलकीनं मराठी सण साजरे केले. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून जेनिलिया मराठी सुद्धा उत्तम बोलते.