Baipan Bhaari Deva: घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या-सारंगच्या संगीत सोहळ्यात 'बाईपण भारी देवा'च्या टीमची हजेरी; लूकनं वेधलं लक्ष

Baipan Bhaari Deva: ऐश्वर्या आणि सारंग यांच्या संगीत सोहळ्यात 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या टीमनं खास लूकमध्ये हजेरी लावली आहे.
Baipan Bhaari Deva
Baipan Bhaari Devaesakal

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाच्या टीमनं छोट्या पडद्यावरील घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत हजेरी लावली आहे. या मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगची लगीनघाई सुरु आहे. अशातच ऐश्वर्या आणि सारंग यांच्या संगीत सोहळ्यात 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या टीमनं खास लूकमध्ये हजेरी लावली आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या सुरु आहे ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम. हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे संगीत सोहळ्याची. या खास सोहळ्यासाठी ऋषिकेश, जानकी, सारंग, ऐश्वर्या आणि संपूर्ण कुटुंबासोबतच खास पाहुणेही परफॉर्म करणार आहेत. स्टार प्रवाहच्या परिवारातील सिंधू-राघव, सागर-मुक्तासोबतच महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट बाईपण भारी देवाची टीमही सारंग आणि ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षकगीतावर परफॉर्म देखिल करणार आहे.

१९ मे ला सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर बाईपण भारी देवा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. त्यानिमित्ताने या टीमने घरोघरी मातीच्या चुली मालिकेत खास हजेरी लावली. तेव्हा पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा संगीत सोहळा.

Baipan Bhaari Deva
Baipan Bhaari Devasakal
Baipan Bhaari Deva
Baipan Bhaari Deva OTT: नवीन वर्षात आनंदाची बातमी! 'बाईपण भारी देवा' या ओटीटीवर पाहा घरबसल्या

घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये हृषिकेष रणदिवे ही भूमिका साकारली आहे. तसेच सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे यांनी देखील या मालिकेत भूमिका साकारली आहे.

Baipan Bhaari Deva
Baipan Bhaari Deva: "मला ऑस्कर मिळावा अशी तिची इच्छा..." सुकन्या मोने कोणाबद्दल म्हणाल्या?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com