

GHAROGHARI MATICHYA CHULI
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर कोरले जातात. एखादं पात्र प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि तीच त्या कलाकाराची ओळख बनते. मालिकेतील काही कलाकार अचानक मालिकेतून रिप्लेस झाले तरीही प्रेक्षकांना ते खटकतं. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून अशीच एक कलाकार अचानक बदलली गेली ज्यामुळे सुरुवातीला प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले होते. अभिनेत्रीने मालिका सोडल्यामुळे अचानक दुसरी अभिनेत्री त्याजागी दाखवण्यात आली. आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्याचीही एंट्री होणार आहे.