
GHAROGHARI MATICHYA CHULI
esakal
स्टार प्रवाहवरील मालिका आणि त्यांचे विषय यामुळे ही वाहिनी गेल्या ५ वर्षांपासून सगळ्या वाहिन्यांच्या वर आहे. महाराष्ट्राची नंबर १ असलेली वाहिनी असूनही अनेकदा मालिकांमध्ये अतिशय टुकार कथा दाखवण्यात येते. अशीच एक मालिका आता वाईट कथेमुळे प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे. ही मालिका आहे 'घरोघरी मातीच्या चुली'. या मालिकेची सध्याची कथा आणि मालिकेचा नवीन प्रोमो पाहून नेटकरी प्रचंड नाराज झालेत आहेत. प्रोमो पाहून नेटकरी मालिकेच्या दिग्दर्शकाला आणि लेखकाला वेड्यात काढताना दिसतायत. काय आहे हा प्रोमो?