

Girish Oak Speaks on Rohit Arya Says He Visited Studio Before Hostage Drama in Powai
Esakal
रोहित आर्य प्रकरणात आता नवनवे खुलासे होते आहेत. पवईत एका स्टुडिओत त्यानं १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. एन्काउंटरमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला. रोहित आर्या याच्या अप्सरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क प्रोजेक्टमधील लेट्स चेंज या उपक्रमांअंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र यात रोहित आर्याने नियमांचं पालन न केल्यानं स्वच्छता मॉनिटरचा दुसरा टप्पा राबवण्यात आला नसल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, रोहित आर्या याने काही मराठी कलाकारांनाही संपर्क साधला होता. अभिनेत्री रुचिता जाधव हिने याबाबत माहिती दिलीय. तर आता अभिनेते गिरीश ओक यांनीही रोहितला आदल्याच दिवशी भेटल्याचं सांगितलंय.