

Marathi Entertainment News : महाराष्ट्रभर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे ‘गोंधळ’ हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या ‘गोंधळ’ या परंपरेवर आधारित आहे.