Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत असल्याची माहिती अमेरिकेतील पोलिसांनी दिली आहे.
Goldy Brar
Goldy Braresakal

Goldy Brar: दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रारची (Goldy Brar) अमेरिकेत हत्या झाली आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता अमेरिकेतील पोलिसांनी नुकताच एक खुलासा केला आहे. अमेरिकेत झालेल्या गोळीबारात गोल्डी ब्रारचा नाही तर एका आफ्रिकन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी खोटी, अमेरिकन पोलिसांचा खुलासा

अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या हत्येसंबंधीचा रिपोर्ट हा पूर्णपणे खोटा असल्याचा खुलासा केला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे तो गोल्डी ब्रार नव्हता, याची आम्ही पुष्टी करतो, असे पोलीस म्हणाले. गोल्डी ब्रारच्या हत्येची अफवा कशी पसरली हे आम्हाला माहीत नाही. विविध वेब साइट्सनं आमच्याकडून कोणतीही पुष्टी न करता गोल्डी ब्रारच्या हत्येच्या बातम्या पसरवण्यास करण्यास सुरुवात केली, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

कोण आहे गोल्डी ब्रार?

गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ ​​सतींदर सिंगजीत सिंग असं आहे. गोल्डी ब्रार हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करतो. अनेक हत्या आणि शस्त्रास्त्र तस्करीतच्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे. गोल्डी ब्रार हा सध्या अमेरिकेत असून तेथून तो पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि कॅनडामध्ये सातत्याने गुन्हेगारी कारवाया करत आहे. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला.

Goldy Brar
Goldy Brar : गँगस्टर गोल्डी ब्रार केंद्र सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित

सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात मानला जाणारा गोल्डी हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्यांच्या सांगण्यावरूनच बिष्णोई गँगनं सिद्धूची हत्या केली, असं म्हटलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com