

Gondhal Movie Romantic Song Out
esakal
Marathi Entertainment News : संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘चांदण’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्याने प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. प्रेम आणि नात्यांच्या कोमल भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पद्मविभूषण इलैयाराजा यांनी या गाण्याला दिलेलं संगीत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच मराठी गाण्याला संगीत दिले आहे.