Goshta Samyukt Manapamanachiesakal
Premier
Goshta Samyukt Manapamanachi: 'गोष्ट संयुक्त मानापमानाची'चा रौप्यमहोत्सवी प्रयोग! मराठी रंगभूमीवरील अविस्मरणीय कलाकृती
25th performance: मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेले नाटक 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' लवकरच आपल्या 25 व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे.
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात 'संगीत मानापमान' हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांमध्ये सादर होत असे. या दोन्ही संस्थांचे मालक– बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, जो पुढे 'संयुक्त मानापमान' या नावाने अजरामर झाला. ही ऐतिहासिक घटना आणि त्यामागील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणारे 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई रंगभूमीच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे.
