GOVINDA VISITS LALBAUGCHA RAJA WITH KOMAL
esakal
GOVINDA AND KOMAL RANI LALBAUGCHA RAJA DARSHAN VIRAL VIDEO: गोविंदा गेल्या काही दिवसापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुनीता आहुजाने त्याच्यावर केलेल्या अनेक आरोपांनंतर कथित गर्लफ्रेंड कोमल रानी स्वर्णकारसोबतच्या रिलेशनशिपबद्दलच्या अफवांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अशातच आता गोविंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत सुनीता आहुजा सोडून कथित गर्लफ्रेंड कोमल राणी पहायला मिळाली. दोघांचा एकत्र दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.