

Sakhar Khallela Manus Movie Poster Out
esakal
Entertainment News : अंगणात उभारलेली गुढी, कौलारू घर, सभोवतालचा निसर्ग आणि नात्यांच्या गोडव्याची चाहूल देणारं वातावरण… अशा आकर्षक पोस्टरसह नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘साखर खाल्लेला माणूस’ हा कौटुंबिक चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच ७ एप्रिल २०२७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची संहिता पुण्यातील दगडू शेठ गणपतीच्या चरणी ठेवून बाप्पाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे.